Powered By Blogger

सकाळच्या ह्या सवयी :पूर्ण आयुष्य बदलून टाकेल


आजचा आपला दिवस कसा जाणार ,हे जाणण्यासाठी आपण आपली  दिवसाची सुरुवात कशी करतो हे महत्त्वाचे असते

यशस्वी लोकांच्या यादीत स्थान निर्माण करायचे असेल तर आपण आपल्या  सवयी तशा बनवल्या पाहिजेत .
आपण आज काय करतोय यावरून आपले भविष्य ठरत असते ,पण आपला आजचा दिवस चांगला नाही गेला तर.....  आजचा दिवस यशस्वी  करण्यासाठी आपल्याला चांगल्या सवयी आत्मसात कराव्या  लागतील,आणि याच् दिवसाची सुरुवात आपण आजच्या सकाळ पासून करूया




सकाळी लवकर उठणे. 

😅प्रत्येकाला नको असणारी सवय, पण यश मिळवायचे आहे,त्यासाठी हे केलेच पाहिजे. (सूर्यासारखे चमकायचे असेल तर सूर्यासारखे जळावे पण लागतं ). 

आयुर्वेदानुसार आपण सूर्योदय होण्याच्या पाऊण तास पहिले उठले पाहिजे यालाच ब्रह्ममुहूर्त बोलतात. पण आपण एक वेळ ठरवून घेतली पाहिजे उठण्याची,सकाळी ४ ते ५ मधे ती वेळ पाहिजे.(सुरुवातीला हे शक्य नाही पण अवघड पण नाहीये). 

आणि हो,सकाळी  लवकर उठतो तर रात्री पण झोपायची योग्य वेळ पाहिजे. आपल्या शरीराला ६-७ तासाची झोप आवश्यक असते. तुम्ही जेव्हा उठता त्याच्या ७ तास पहिले तुम्ही झोपले पाहिजे. 

   दिवसाची शांत सुरुवात करणे. 

नक्कीच तुमचा प्रश्न असणार शांत सुरुवात करायला शांत झोप झालेली पाहिजे ? (शांत झोप कशी येईल यासाठी लवकरच एक ब्लॉग लिहील  )
 सकाळी उठल्यावर लगेच घाई मधे सुरुवात करू नका,आपल्या मेंदू ला थोडा वेळ द्या सेट होयला. (एक प्रश्न तुमच्यासाठी what is sudden cardiac death?)
डोक्यात खूप विचार नाही आले पाहिजे त्या साठी मोबाईल ला हात नका लावू . हो,डोक्यात अचानक काही कल्पना आली आपल्या कामाबद्दल तर ती लगेच लिहून ठेवा,सकाळच्या वेळी डोकं शार्प चालते😇😇. 
मोबाईल ला दूर ठेवा,डोळयांवर हेवी लाईट येऊन नका देऊ.

आपल्या शरीराला हायड्रेटेड करणे 

रात्रभर झोपल्यानंतर आपल्या बॉडीला रिहायड्रेट करण्यासाठी पाण्याची गरज असते,पाणी पिल्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर जायला मदत होते.
कोमट पाणी पिले तर अत्युत्तम कारण कोमठ पाण्याचे फायदे काय ते नवीन सांगण्याची गरज नाही.
सुरुवातीला पाणी पिले जाणार नाही तर अश्या वेळी त्यात लिंबू कापून टाकणे किंवा फ्लेवर येण्यासाठी संत्री,मध हे  टाकू शकतो.  


वाचणे (READING)

पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपल्याला  घेऊन जाणारी जहाजे होत. 
सकाळी आपल्याला चार्जे करण्यासाठी, दिवसभरासाठी  प्रेरणा देण्यासाठी,आपले विचार वाढविण्यासाठी किव्हा स्वतःला विकसित करण्यासाठी पुस्तके खूप महत्वाचे आहेत. 
सकाळी  ऊठून तुम्ही काही वेळ प्रेरणादायी पुस्तके किंवा जीवनचरित्र वाचू शकता. 
जर स्वतःचा  शोध घेयचा असेल ना तर चांगली पुस्तके वाचा. 

स्वतः ला अनुमोदित करा (AFFIRMATION)

तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे ?काय मिळवायचे ?तुमची बकेट लिस्ट काय ? ह्या सर्व गोष्टी तुम्ही स्वतःला सांगा दररोज,असे केले तर तुम्ही तुमची ध्येय लवकर सत्यात उतरविणार. 
असे काही लिहा जे तुम्हला ताकद  देईल. 
तुम्ही दिवसाचा प्लॅन तयार करून ठेवा,यामुळे तुमचा दिवसाचा रोड मॅप तुमचा हातात असेल. 


व्यायाम /योगा /ध्यान (EXERCISE/MEDITATION/YOGA) 

यशस्वी होयचे असेल तर त्याला आरोग्यची साथ पाहिजेच ,शरीर चांगले तर सर्व काही चांगले.
नियमित योगा केल्यामुळे बराच ताणतणाव कमी होतो.
सकाळी उठून बाहेर चालायला जाऊ शकतो सकाळची ताजी हवा ,सकाळचे कोवळे ऊन याचा आस्वाद घेऊ शकता  



सकाळचा नाश्ता (MORNING BREAKFAST)

नाश्ता शरीराला ऊर्जा देतो.सकाळी घेण्यात आलेल्या नाश्त्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम ,लोह,बी जीवनसत्व ,प्रोटीन,कार्बोहायड्रट्स घेतली गेली पाहिजे . जी शरीराला दिवसभरासाठी अत्यावश्यक असतात. दररोज सकाळी नाश्ता केला तर शरीरातील ऊर्जेची कमतरता भरून निघते,आपण दिवसभर उत्साही राहतो. 





 वरील  सर्व गोष्टी आपण दररोज केल्या तर आपण  .....      
आपल्या शरीराला झोपायची आणि उठायची  सवय लावू ,     
 चिडचिड ताणतणाव कमी होईल  
शरीर निरोगी राहील 
ध्यान केल्यामुळे मनावर ताबा ठेऊ  
वाचन केल्यामुळे स्वतःचा शोध घेऊ 
दिवसभरचा प्लॅन  केल्यामुळे,वेळ वाचवू 
दिवसभर आपण पॉझिटिव्ह  राहु 
    एवढ्या गोष्टी मिळवू शकतो ,ह्याच गोष्टी  आपल्याला  यशाकडे घेऊन जातात .


📌 SANKET GAIKWAD
 Read Previous Blog: